Ravet News : उद्यानातील झाडाच्या फांद्या चोरणाऱ्यावर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा

एमपीसी न्यूज – झाड्याच्या फांद्या चोरून नेणाऱ्यावर रावेत पोलीस ठाण्यात (Ravet News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.16) वीर सावरकर उद्यानातील गणेश तलाव येथे घडला.

गोरख रतन गोसावी (वय 57 रा. भोसरी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून इसरार जफर शहा (रा. निगडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमीत्त गरिबांना अन्नदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याच्या टेम्पोमधून (एम एच 14 सी पी 7086) 1 हजार 100 किलो वजनाचे एकूण 2 हजार 200 रुपयांच्या झाडांच्या फांद्या व लाकडे महापालिका मध्यवर्ती नर्सरी सेक्टर नं 27 निगडी प्राधिकरण 44 येथे न नेता परस्पर चोरून नेल्या. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.