Pimpri News : व्यापाऱ्याने दागिने करण्यास दिलेले तब्बल 17 तोळे सोने लंपास

एमपीसी न्यूज – सोन्याचे दागिने (Pimpri News) करण्यासाठी दिलेले 17 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोने कारागिराने लंपास केले आहे. हा प्रकार पिंपरी गाव येथील जयलक्ष्मी ज्वेलर्स येथे 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी हितेश रमेश दोशी (वय 45 रा. काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून पोलिसांनी रॉनी ताजूद्दीन शेख (रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : हडपसर रेल्वे स्टेशनवरून आता स्वारगेट व डेक्कनसाठी सुरु होणार पीएमपीएमएल बस सेवा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्याकडील 175 ग्रॅम वजनाच्या 7 लाख 87 हजार 500 रुपयांच्या दोन सोन्याच्या लगडी आरोपी याला दिल्या होत्या. त्या सोन्यातून आरोपीला नेकलेस, गंठण, अंगठ्या, चैन, झुमके तयार करण्यासाठी दिले होते. मात्र दागिने व सोने परत करता सोन्याचा अपहार केला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.