Pune News : हडपसर रेल्वे स्टेशनवरून आता स्वारगेट व डेक्कनसाठी सुरु होणार पीएमपीएमएल बस सेवा

एमपीसी न्यूज – स्वारगेट ते हडपसर रेल्वे स्टेशन व डेक्कन जिमखाना ते हडपसर रेल्वे स्टेशन हे (Pune News) दोन बस मार्ग येत्या मंगळवार (दि.22) पासून सुरु होणार आहेत. आठवड्यातून रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी बस धावणार आहेत.

प्रवाश्यांच्या वाढत्या मागणीनुसार ही बससेवा सुरु कऱण्यात आली आहे. पुणे स्टेशनवरील काही रेल्वे या आता हडपसर रेल्वे स्थानकावर थांबतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारपासून मार्ग क्र. 23 स्वारगेट ते हडपसर रेल्वे स्टेशन (मार्गे – स्वारगेट, गोळीबार मैदान, जुना पुलगेट, बॉम्बे गॅरेज, उजवीकडे वळून लष्कर पोलीस स्टेशन, क्राऊन रोड, घोरपडी पोस्ट, हडपसर रेल्वे स्टेशन)

तर मार्ग क्र.171 डेक्कन जिमखाना ते हडपसर रेल्वे स्टेशन (मार्गे – डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज, पुणे मनपा, गाडीतळ/जुना बाजार, आंबेडकर पुतळा, साधु वासवानी चौक, रुबी हॉल, ब्ल्यू-डायमंड हॉटेल, भैरोबा पंपिंग स्टेशन, हडपसर रेल्वे स्टेशन) हे दोन नवीन बस मार्ग सुरु करण्यात येणार आहेत.

बस सुटण्याच्या वेळा रविवार, मंगळवार व शुक्रवारी असून –  Pune News

1) स्वारगेट ते हडपसर रेल्वे स्टेशन स्वारगेटहून सकाळी 9 वाजून 25 मिनीटांनी तर दुपारी दोन वाजता अशी बसची वेळ असणार आहे.

2) हडपसर रेल्वे स्टेशन ते स्वारगेट हडपसर रेल्वे स्टेशनहून सकाळी 11 वाजून 10 मिनीट, दुपारी तीन वाजता

3) डेक्कन जिमखाना ते हडपसर रेल्वे स्टेशन – डेक्कन जिमखाना हून सकाळी 9 वाजून 55 मिनिटे व दुपारी 1 वाजून 55 मिनीट

4) हडपसर रेल्वे स्टेशन ते डेक्कन जिमखाना – हडपसर रेल्वे स्टेशनहून सकाळी अकरा व दुपारी तीन वाजून 5 मिनिटे

 

या दोन नवीन बस मार्ग सुरु होत असल्याने हडपसर रेल्वे स्टेशन वरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे, तरी जास्तीत-जास्त प्रवासी नागरिकांनी या बस सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. तसेच प्रवासी संख्या व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर आणखी बसेस वाढविण्यात येतील, असे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.