Indrayaninagar : मेडिकलच्या छताचा पत्रा उचकटून संगणक व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – मेडिकल शॉपचा पत्रा उचकटून (Indrayaninagar) त्यातील संगणक व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही चोरी भोसरीतील इंद्रायणीनगर येथे शुक्रवारी (दि.18) रात्री घडली.

याप्रकरणी भगवान मच्छिंद्र शेटे (वय 34 रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह दाखल कऱण्यात आला आहे.

Pune News : माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या 105 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे इंद्रायणीनगर (Indrayaninagar) येथे केशर मेडिकल स्टोअर आहे. चोरट्यांनी फिर्यादीच्या मेडिकल शॉपचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला व दुकानातील संगणक, मेडिकल साहित्य व रोख रक्कम असा एकूण 53 हजार 400 रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. या आधीही काही दिवसांपूर्वी भोसरीमध्ये किराणा दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी चोरी केली होती. भोसरी पोलीस ठाण्यात या चोरी बद्दलही गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.