Pune News : माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या 105 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

एमपीसी न्यूज – भारताच्या महिला माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी (Pune News) यांच्या 105 व्या जयंती निमित्त आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास माजी नगरसेविका नीता रजपूत व ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना नीता रजपूत म्हणाल्या की, ‘‘एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. 1966 मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होत्या. बालपणी त्यांनी ‘बाल चरखा संघ’ स्थापन केला आणि असहकार चळवळी दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या मदतीकरिता 1930 मध्ये लहान मुलांच्या साथीने ‘वानर सेना’ देखील उभी केली होती.

Pune News : ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनकार्याला आवश्यक निधी देऊ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

1947 साली इंदिरा गांधी यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली (Pune News) दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केले. इंधिरा गांधींनी आपल्या जीवनात अनेक क्षेत्रात लौकिक प्राप्त केला. त्यांना 1972 मध्ये भारतरत्न पुरस्कार, 1972 मध्ये बांगलादेश मुक्तीकरिता मेक्सिकन अकादमी पुरस्कार, 1973 मध्ये एफएओ चे दुसरे वार्षिक पदक व 1976 मध्ये नागरी प्रचारिणी सभेकडून साहित्य वाचस्पती (हिंदी) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 1953 साली इंदिरा गांधीं यांना अमेरिकेच्या ‘मदर’ पुरस्काराने, मुसद्देगिरीतील उत्कृष्ट कार्याबद्दल इटलीने ‘इसाबेला डी’इस्टे’ पुरस्कार व येल विद्यापीठाने हाउलंड मेमोरियल पुरस्कार देऊन गौरविले. अशा या आर्यन लेडी म्हणून कायम जगामध्ये व विशेषत: भारतीयांच्या मनामध्ये सदैव राहतील.’’

यावेळी शेखर कपोते, लतेंद्र भिंगारे, अनिस खान, मनोहर गाडेकर, हमीद इनामदार, संजय नांगरे, चंद्रकांत नार्वेकर, भारत इंगुले, संगीता शिरसाट, भास्कर कांबळे, आप्पा गायकवाड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.