Wakad Playground : कुणी क्रीडांगण देता का क्रीडांगण? वाकडमधील मुले व युवकांची आर्त हाक

एमपीसी न्यूज : वाकड हे मुळा नदी किनारी वसलेले गाव असून त्याचा समावेश पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत (Wakad Playground) आहे. हे गाव पुणे शहर, बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल व हिंजवडी आय टी पार्क जवळ असल्याने गेल्या 20 ते 30 वर्षात या गावाचा झपाट्याने विकास झाला आहे. येथे लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली, पण सोई सुविधा त्या प्रमाणात वाढल्या नाहीत. त्यामुळे येथे एकही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडांगण नसल्याने कुणी क्रीडांगण देते का क्रीडांगण ?? अशी वेळ वाकडमधील मुले व युवकांवर आली आहे.

साधारण 20 ते 30 वर्षांपूर्वी वाकड एक छोटे गाव होते. सर्व ठिकाणी शेती व मोकळी जागा होती. पण, जसा हिंजवडी येथे आय टी पार्क सुरु होऊ लागला, तसे शेती व मोकळ्या जागेवर मोठमोठे गृह प्रकल्प उभे राहू लागले. त्यामुळे येथे आता सुमारे 400 हौसिंग सोसायट्या आहेत. ज्यांच्या मध्ये 100 ते 1,000 फ्लॅट्स आहेत.

याबाबत दत्तात्रेय देशमुख (पिंपरी चिंचवड को- ऑपेरेटीव हौसिंग फेडरेशन, चेअरमन) म्हणाले, की ”वाकड गावाचा विकास झपाट्याने झाला आहे. वाकड परिसरातून सर्वात जास्त मालमत्ता कर पिंपरी चिंचवड मनपाला मिळतो. पण, येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. आपण आज बाल दिन साजरा करत आहोत, पण वाकडमधील मुलांना खेळण्यासाठी एकही मनपाचे सार्वजनिक उद्यान उपलब्ध नाही. बऱ्याच हौसिंग सोसायटयांना त्यांचे स्वतःचे मैदान नाही. त्यामुळे मुलांना विविध खेळ खेळता (Wakad Playground) येत नाहीत.

सचिन लोंढे (वाईस चेअरमन, पिंपरी चिंचवड को- ऑपेरेटीव हौसिंग फेडरेशन) म्हणाले की, “वाकड परिसरात एकही सार्वजनिक क्रीडांगण नसल्याने मुलांना, युवकांना व पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे खाजगी मैदाने व क्रिडांगणे आहेत. पालकांना त्यांच्या मुलांना तेथे पैसे भरून खेळण्यासाठी पाठवावे लागते. बास्केटबॉलच्या 3 दिवसाच्या कोर्ससाठी 2,000 रुपये फी, फुटबॉलच्या 3 दिवसाच्या कोर्ससाठी 1,500 रुपये फी, क्रिकेट खेळण्यासाठी 700 रुपये प्रति तास असे विविध खेळांसाठी वेगवेगळी फी भरावी लागते.

Pimpri : पंडित जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार – जितेंद्र वाघ

देशमुख आणि लोंढे यांनी फेडरेशनच्या वतीने मागणी केली, की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लवकरात लवकर मैदान व क्रीडांगण (Wakad Playground) यांचे आरक्षण ताब्यात घेऊन ते विकसित करून मुलांसाठी व सर्व नागरिकांसाठी खुली करावीत.

याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाशी सपंर्क साधला असता अधिकाऱ्यांनी सांगितले, की चिल्ड्रेन प्लेग्राउंड व खेळाचे मैदान यासाठी प्रत्येकी एक आरक्षण शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) नुसार आहे. दोन्ही आरक्षणांच्या जागा मनपाच्या ताब्यात नाहीत. चिल्ड्रेन प्लेग्राउंडसाठी 700 चौ. मी क्षेत्र आरक्षित आहे. खेळाच्या मैदानासाठी 5,000 चौ. मी क्षेत्र आरक्षित आहे. पण, त्यासाठी काहीच जमीन ताब्यात मिळाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.