Pimpri Corona Update : शहरात आज 24 नवीन रुग्णांची नोंद; 5 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील (Pimpri Corona Update) 24 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. (Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 71 हजार 968 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 217 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 209 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

PCMC News : महापालिका आयुक्त आठवड्यातील तीन दिवस नागरिकांना भेटणार

तर, 8 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहेत.(Pimpri Corona Update) आज दिवसभरात 196 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 82 हजार 997 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.