मोबाईल चोरताना हटकले म्हणून रिक्षाचालकावर चाकुने केले वार

एमपीसी न्यूज – मोबाईल चोरताना हटकले म्हणून चोरट्याने रिक्षाचालकावर चाकुने वार केले आहेत. ही घटना येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात मंगळवारी (दि.2) सायंकाळी सहा वाजता घडली.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अक्षय चव्हाण (वय 28 रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार काळ्या रंगाची पल्सर वरून आलेल्या इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षामधून त्यांचे भाडे सोडण्यासाठी बाणेर कडे जात होते. यावेळी सिग्नलला चौकात थांबले असताना आरोपी दुचाकीवरून आला व त्याने फिर्यादी यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरला. यावेळी रिक्षा खाली उतरून फिर्यादी यांनी जाब विचारला असता आरोपीनेच उलट फिर्यादीशी वाद घालत थांब तुला बघून घेतो म्हणून फिर्यादी जवळ आला. त्याने त्याच्या खिशातील चाकु काढून फिर्यादीच्या पोटावर, खांद्यावर वार करून त्यांना जखमी केले. यावरून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.