Nigdi : टिळक चौकातील हातगाड्यांवर कारवाई 

एमपीसी न्यूज – निगडीतील टिळक चौकातील अतिक्रमणावर वाहतूक पोलिसांनी आज (शनिवारी) धडक कारवाई केली. त्यामुळे पदपथाने मोकळा श्वास सोडला. 

निगडीतील टिळक चौकात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले. फेरीवाल्यांना पदपथ गिळंकृत केला आहे. त्यामुळे सायंकाळी नागरिकांना चौकातून चालणे मुश्किल झाले आहे. अतिक्रमणामुळे चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीचा सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच चौकात रिक्षाचालक देखील मोठ्या प्रमाणात थांबतात. त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही.

चौकातील अतिक्रमण आणि रिक्षांवर आज वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामुळे पदपथाने मोकळा श्वास सोडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.