Pune – केबल रिपेअरिंगचे काम सुरु करण्यासाठी गणपतीच्या वर्गणी स्वरूपात मारण्याची धमकी देऊन मागितली 70 हजारांची खंडणी

एमपीसी न्यूज – सुपरव्हिजन करणाऱ्या अधिकाऱ्यास केबल रिपेअरिंगचे काम सुरु करण्यासाठी गणपतीच्या वर्गणी स्वरूपात खंडणी मागणा-यांपैकी एकाला अटक केली. ही घटना काल (दि.14) पहाटे साडेतीनच्या सुमारास विश्रांतवाडी येथील सुयोग डायग्नोस्टीकजवळ घडली.

याप्रकरणी राहुल सणस (वय 35, रा. कोथरूड) फिर्याद दिली आहे. गौरव उर्फ पिंट्या सत्यवान वहिले (वय 27, रा.विश्रांतवाडी) व आणखी चारजणांनी ही खंडणी मागितली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव व इतर चार जणांनी मिळून राहुल सणस यांच्या केबल रिपेअरिंगच्या कामात अडथळा निर्माण करून केबल कंपनीचे गेलेल्या सुपरव्हिजन करणाऱ्या अधिकाऱ्यास केबल रिपेअरिंगचे काम सुरू करण्यासाठी दोन गणपती मंडळांना प्रत्येकी 50 हजार रुपये वर्गणी स्वरूपात खंडणी मागितली व त्यानंतर एका मंडळाची 70 हजार रुपये वर्गणी द्या नाहीतर केबलचे काम सुरू करू देणार नाही व काम केल्यास मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी, गौरव वहिले याला ताब्यात घेतले असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.