Pimpri news : विमल फाउंडेशनच्या वतीने YCM मध्ये व्यसनमुक्ती समुपदेशन कार्यशाळा

एमपीसी न्यूज : वायसीएम रूग्णालयातील सुरक्षारक्षकांसाठी विमल फांउडेशनच्या वतीने सोमवारी 12 सप्टेंबरला व्यसनमुक्ती समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली.(Pimpri news) 1 जुन पासुन वायसीएमचे आधिष्टाता डॉ राजेंद्र वाबळे यांनी तंबाखू व तत्सम अंमली पदार्थ मुक्त वायसीएम रूग्णालय करण्याच्या दिशेने ही कार्यशाळा आयोजित केली होती.

या व्यसनमुक्त समुपदेशन कार्यशाळेत श्री. तुषार शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रार्थना घेऊन प्रस्तावना केली. डॉ. निलीमा बोरकर यांनी तंबाखू व तत्सम अंमली पदार्थांचे शरीरावर होणारे दुष्परिणामांची शास्त्रीय माहिती देत कशा प्रकारे आज व्यसनमुळे अनेक शारीरिक आजार होतात हे सांगितले.(Pimpri news) व्यसनमुक्ती समुपदेशक व संस्था अध्यक्ष विल्यम साळवी यांनी व्यसनमुक्ती कशी शक्य आहे या बद्दल माहिती दिली.

FDA action : वानवडी येथील पनीर कारखान्यावर FDA ची कारवाई

सर्वांचे आभार सौ जयश्री जगताप यांनी मानले. वरील कार्यक्रमास महिला सुरक्षारक्षकांसह 76 सुरक्षारक्षक ही उपस्थित होते व अनेकांनी आजपासुन तंबाखू न सेवन करण्याची ग्वाही दिली.(Pimpri news) वायसीएम अधिष्ठाता डॉ राजेंद्र वाबळे व सुरक्षारक्षक संदिप बहिवाल यांनी व्यसनमुक्ती समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन केले होते. विमल फांउडेशनच्या वतीने हा कार्यक्रम पुढे सहा महिने टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.