Woman Harassment: पती व सासऱ्याच्या छळानंतर पीडित विवाहितेची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज – पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने पत्नीने त्यास विरोध केला. त्यावरून पतीने पत्नीचा छळ केला. सासऱ्याने ही सुनेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. यासाऱ्या प्रकारानंतर पीडितेने थेट पोलिसात धाव घेतली आहे.

याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेत पती (वय34) आणि सासर्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सन 2018 ते 11 नोव्हेंबर २०२२ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला आहे.

Chikhali Chainsnatching News : पती सोबत शतपावली करणाऱ्या महिलेचे दागिने हिसकावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते. त्याला विवाहितेने नकार दिला. त्यावरून त्याने विवाहितेला मारहाण, शिवीगाळ केली. त्यानंतर पती एका महिलेला घेऊन खेड येथे राहण्यासाठी गेला. त्यानंतर सासऱ्याने फिर्यादीसोबत गैरवर्तन केले. तुझ्या आणि तुझ्या पतीच्या नावावरील कर्ज फेडतो. जमीन पतीच्या नावाने करतो असे म्हणत सासऱ्याने विवाहितेकडे शरीर संबंधाची मागणी केली. याबाबत विवाहितेने पतीला सांगितले असता पतीने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.