Pimpri : ‘पं. नेहरू भारताचे भाग्य विधाते’ – अक्षय शहरकर

एमपीसी न्यूज : दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी (Pimpri) स्वातंत्र्यप्राप्ती नंतर देशाच्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी धोरण निश्चित केले. ते भारताचे भाग्य विधाते होते, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या पर्यावरण सेलचे अध्यक्ष अक्षय शहरकर यांनी केले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ गुरुद्वारा रस्त्यालगत शहरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

शहरकर म्हणाले, पंडित नेहरूंनी पंचवार्षिक योजना सुरू करून भारताच्या नियोजनबद्ध विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या दूर दृष्टीमुळे भारताने विकसनशील देशांच्या यादीत वरचे स्थान मिळवले. देशाच्या शाश्वत विकासासाठी आजही पंडितजींचे विचार, ध्येय धोरणे आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत. देशाचा विकास करण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कटीबद्ध आहे. जनता केंद्रातील भाजपा सरकारला कंटाळली आहे. भविष्यात कॉंग्रेसच देशाचा स्थिर आणि शाश्वत विकास करू शकते, पुन्हा एकदा केंद्रात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वास शहरकर यांनी व्यक्त केला.

Woman Harassment: पती व सासऱ्याच्या छळानंतर पीडित विवाहितेची पोलिसात धाव

यावेळी (Pimpri) अमर नाणेकर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पर्यावरण विभाग, अशोक काळभोर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव पर्यावरण विभाग, मीना गायकवाड, मंगेश मोरे, सिद्धांत रिकीबे, देवानंद ढगे ,अमोल तेलंगे, विशाल म्हेत्रे, मनोज ढकोलिया, सचिन धावरे, प्रकाश पवार आदी उपस्थित होते. अशी माहिती अक्षय शहरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.