Akurdi : गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर

एमपीसी न्यूज – गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त (Akurdi)भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंढे व संसदरत्न खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डीतील श्री हेल्थ अँड डेंटल स्टुडिओच्या वतीने आरोग्य शिबीर पार पडले.

शिबिराचे उदघाटन पीएमआरडीचे माजी अध्यक्ष, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक अमित गावडे, योगिता नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते कमलजित सिंग आदी उपस्थित होते.

Pune : शिंदे गटातील खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा

या शिबीरामध्ये रुग्णांची मोफत दंत तपासणी,(Akurdi) संपूर्ण आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, फिजिओथेरपी तपासणी व उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ. श्रीकृष्ण मुंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक केशव घोळवे, ग्रामप्रबोधिनी संस्थेचे कार्यवाह व्यंकटराव भताने, डॉ. विक्रम महाडिक, डॉ. श्रुती सोनी, डॉ. विराज गिरासे, डॉ. हृषीकेश कातकडे, राहुल ढाकणे, विष्णू मुंढे, रेखा वाघमोडे आदींनी सहकार्य केल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.