Bhosari : मास्टर माईंड स्कूल येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – भोसरी येथील मास्टर माईंड स्कूल (Bhosari)येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा रविवारी (दि.10) उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे आयोजन मास्टर माईंड शाळेच्या प्राचार्या प्रदीपा नायर यांनी केले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्टार बड्स स्कूलचे प्राचार्य नागराजन लक्ष्मण तसेच डायरेक्टर ऑफ स्टार बडस स्कूल, प्रिया नागराजन आणि पिटर पिल्ले नॅशनल कोच व रेफ्री ऑफ कॅरम यांना आदी उपस्थित होते.

Khed : गोशाळेतून तीन जनावरे चोरीला

यामध्ये 12 वर्षे अंतर्गत मुले आणि मुली, 14 वर्ष (Bhosari)अंतर्गत मुले आणि मुली, 18 वर्षे अंतर्गत मुले आणि मुली तसेच प्रौढ वर्गाने ही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषक वितरण करण्यात आले.

मास्टर माईंड शाळेचे खेळाचे शिक्षक प्रियंका कदम पांचाळ, डॅनिअल पिल्ले व पवन लोहार यांच्या नियोजित प्रशिक्षणा अंतर्गत स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. अश्या प्रकारे सर्व उपस्थितांच्या सहभागाने स्पर्धा व बक्षीस वितरण उत्कृष्ट पद्धतीने पार पडले.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.