Nagpur: रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामे बंद करावी; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

एमपीसी न्यूज – नागरिकांना त्रास होत असल्याने रात्रीच्या वेळी (Nagpur)चालणारी बांधकामे बंद करावीत, अशी जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज विधानसभेत बोलताना केली आहे.

शिरोळे यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मुद्द्यांद्वारे बांधकाम नियमावलीचा विषय मांडला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुणे शहर हे वेगाने वाढत आहे.शहरभर दुप्पट वेगाने बांधकामे सुरु आहेत.

Pimpri : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल यांचे निधन

अनेक ठिकाणी रात्री बे रात्रीच्या वेळेस बांधकामे चालतात. बांधकामासाठीची वाहने, अवाढव्य यंत्रसामग्री यांच्या आवाजाचा त्रास आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना होत असतो. याबाबतच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर महापालिकेकडून बांधकाम कोणत्या वेळेत सुरू ठेवावे तसेच हे काम करताना आजू‌बाजूच्या नागरिकांना काही त्रास होणार नाही, यासाठी काय काळजी घ्यावी, अशी कोणतीही नियमावली तयार केलेली नाही असे निदर्शनास आले आहे. तरी पुणे महानगरपालिकेस बांधकाम नियमावली करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेतच बांधकामे करता येतात. त्या व्यतिरिक्तच्या वेळात बांधकामे करता येणार नाहीत, असे आदेश आहेत. पण, हे आदेश डावलून रात्रीच्या वेळी बांधकामे सुरू असतात. ही बाब आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आहेत .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.