Pimpri : आमदार रोहित पवार यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन

एमपीसी न्यूज – युवा संघर्ष यात्रा नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर राष्ट्रवादी (Pimpri) काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज (गुरूवारी) पिंपरीत आंदोलन करण्यात आले.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस कष्टकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन आहेर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विशाल जाधव, विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस तुषार गाडे, सचिव ऋषभ भडाळे, उपाध्यक्ष ऋषिकेश सत्रे, मुख्य सरचिटणीस चैतन्य बनकर, पिंपरी अध्यक्ष ऋतिक गायकवाड, महाविद्यालय अध्यक्ष अभिषेक कांबळे, सुरज देशमाने, भोसरी विधानसभा अध्यक्ष संकेत वाघमारे, विश्वजित लोंढे, मनोज माने यांच्यासह महिला कार्यकर्त्या सहभागी झाले होते.

Nagpur: रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामे बंद करावी; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

काशिनाथ नखाते म्हणाले, “राज्यात कष्टकऱ्यांवर अन्याय होत आहे. पण तरुणांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या आमच्या नेत्यांवर लाठीचार्ज व अटक करण्याचा प्रयत्न म्हणजे सरकारची दडपशाही आहे. असा प्रकार पुन्हा घडल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा (Pimpri) इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे आणि महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर यांनीही संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार यांना झालेल्या अटकेचा निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.