Pune : पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार, आता उमेदवारांची उत्सुकता

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा पोटनिवडणूक तातडीने घेण्याचे (Pune)आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट), भाजप यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. भाजपाकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर आणि बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने कमालीचा वेळ लावला आहे.

Akurdi : गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर

त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. दुसरीकडे (Pune)प्रशासनाने या निवडणुकीची तयारी पूर्ण केल्याचा दावा केला आहे. सध्या राज्यात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपची सत्ता आहे. जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळे घटकपक्षांना भाजपचा प्रचार करावा लागणार आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या पक्षातर्फे माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे आणि पुणे शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर, काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा आहे.

या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांचा सल्ला महत्वपूर्ण ठरणार आहे. शिवसेनेची समजूत घालणार का, याकडे लक्ष लागले आहे. शिवाय पवार स्वतः चा उमेदवार देणार का, याची उत्सुकता लागली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.