Pimpri : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका शोभा गुरमितसिंग आदियाल (वय 65) यांचे (Pimpri ) आज (गुरुवारी) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत पिंपळेगुरव प्रभागातून त्या निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या विजयी झाल्या होत्या. महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद देखील त्यांनी भूषविले होते. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

Pune : शिंदे गटातील खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा

उपचारानंतर रुग्णालयातून त्यांना घरी सोडले होते. दोन दिवसांपूर्वी पुन्हा त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी दीड वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पिंपळेगुरव येथील स्मशानभूमीत सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.