Pune : शिंदे गटातील खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा

एमपीसी न्यूज – शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर शिंदे गटातील (Pune) खासदार भाजपच्या कमळ चिन्हावर आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची कुजबुज आहे. येत्या काही महिन्यांतच लोकसभा निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या खासदारांचा विश्वास आहे. शिवाय 5 राज्यातील 3 राज्यामध्ये भाजपने 1 हाती सत्ता मिळविली. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.

2024 लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. सध्या उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्षानुवर्षे भाजपच्या सोबत असलेल्या शिवसेनेने (ठाकरे गट) ‘ऐकला चलोरे’ची  भूमिका घेतली आहे.

Pune : हडपसरची वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आक्रमक

शिवसेना खासदार सोडून गेल्याची चीड ठाकरे गटात निर्माण झाली आहे. शिंदे (Pune) गटातील आमदार आणि खासदार प्रचंड अस्वस्थ आहे. त्यामुळे त्यांना आगामी काळात कमळ आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचे शिवसेना नेते सचिन अहिर यांनी म्हटले आहे. तर, आमच्या खासदारांना कमळ आणि घड्याळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविण्याची गरज पडणार नाही. ही जी काही चर्चा आहे. ती चुकीची आहे. न्यायालयाने आम्हाला धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. त्यावरच आम्ही निवडणूक लढविणार असल्याचे पुणे शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=SMr_YX0RQAg

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.