Khed : गोशाळेतून तीन जनावरे चोरीला

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील बिरदवाडी येथील (Khed)एका ट्रस्टच्या गोशाळेतून तीन जनावरे चोरीला गेली आहेत.ही घटना 8 नोव्हेंबर रोजी रात्री माऊली गोशाळा ट्रस्ट येथे घडली.

याप्रकऱणी गणेश ज्ञानदेव हुलावळे (वय 32 रा.चाकण)(Khed) यांनी बुधवारी (दि.13) फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune : पुणे महापालिका क्षेत्रातील विनापरवाना अनधिकृत बांधकामे रोखणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गोशाळा चालक असून त्यांच्या गोशाळेतून चोरट्यांनी दोन म्हशी व एक गाय अशी 50 हजार रुपयांची तीन जनावरे चोरून नेली. हा प्रकार उघडकीस येताच हुलावळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

https://www.youtube.com/watch?v=SMr_YX0RQAg&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.