PMPML : आळंदी यात्रेत पीएमपीएमएलला 9 कोटी 92 लाखांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे कार्तिकी एकादशी (PMPML) आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलकडून ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले. त्याचा पीएमपीएमएलच्या उत्पन्न वाढीसाठी चांगला फायदा झाला. आळंदी यात्रेत सोडलेल्या गाड्यांमुळे पीएमपीएमएलला सहा दिवसात तब्बल 9 कोटी 92 लाख 99 हजार 890 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

कार्तिकी एकादशी आणि संजीवन समाधी सोहळ्यासाठी यावर्षी अलंकापुरी आळंदीमध्ये सात ते आठ लाख भाविक येणार असल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली होती. राज्याच्या विविध भागातून भाविक पुणे शहरात येतात. तिथून ते आळंदी येथे दाखल होतात. त्यामुळे आळंदी येथे येण्यासाठी शहराच्या विविध भागातून अतिरिक्त बस गाड्या सोडण्यात आल्या. आळंदी यात्रेसाठी 6 ते 12 डिसेंबर या कालावधीत पीएमपीएमएल कडून 342 ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या.’

MP Shrirang Barne : रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डीपीआर करा, वंदे भारतसह विविध एक्सप्रेसला थांबा द्या

स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, (PMPML) देहूगाव, भोसरी या ठिकाणावरून आळंदीसाठी ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या. मागील वर्षी आळंदी यात्रेदरम्यान 11 लाख 25 हजार 693 प्रवाशांनी पीएमपीने प्रवास केला. त्यातून पीएमपीएमएलला 9 कोटी 79 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी 12 लाख 77 हजार प्रवाशांनी पीएमपीएमएलने प्रवास केला. त्यातून पीएमपीएमएलला 9 कोटी 92 लाख 99 हजार 890 रुपये एवढे उत्पन्न मिळाले.

पिंपरी-चिंचवड शहराला लागून देहू आणि आळंदी ही दोन्ही तीर्थक्षेत्र आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून दोन्ही तीर्थक्षेत्री जाण्यासाठी मुबलक वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे. आळंदी यात्रेसाठी येणारे भाविक श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर देहूगाव येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येतात. तिथून ते भंडारा डोंगर येथेही जातात. त्यामुळे पीएमपीएमएलने भाविकांच्या सोयीसाठी या मार्गावर अधिक गाड्या सोडल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.