Pune : हडपसरची वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आक्रमक

एमपीसी न्यूज – हडपसरची वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी (Pune) शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या सकाळी 11 वा. मगरपट्टा – खराडी बायपास येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील कोंढवा रस्ता असो की केशवनगर- मांजरी येथील मुख्य रस्ता, संपूर्ण हडपसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलं आहे, प्रत्येक रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी असून प्रशासनाने तात्काळ नियोजन करून हडपसर परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, या मुख्य मागणीसाठी हजारो हडपसर नागरिकांच्या समवेत मगरपट्टा-खराडी बायपास मुख्य रस्त्यावरील महात्मा फुले चौक, मुंढवा येथे उद्या मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

Pune : भारताने चीनचा रेकॉर्ड मोडला; पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावाने

अशी माहिती प्रमोदनाना भानगिरे (Pune)यांनी दिली. दरम्यान, रोज होणाऱ्या हडपसर मतदारसंघातील वाहतूक कोंडीला नागरिक वैतागले आहेत. यामध्ये काही जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. तर, काही जनांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. रोज होणारे अपघात चिंताजनक आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.