Kamshet : कामशेत येथील जुगार अड्ड्यावर छापा, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : कामशेत जवळील बकुसगाव येथील जुगार अड्ड्यावर (Kamshet) लोणावळा ग्रामीण व कामशेत पोलिसांनी संयुक्तपणे छापा मारला आहे. ही कारवाई रविवारी (दि.10) सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना त्यांच्या बातमीदारामार्फत जुगार अड्ड्याबाबत खबर मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकांना सूचना केल्या. यावरून लोणावळा उपविभाग व कामशेत पोलीस यांनी संयुक्तपणे सपाळा रचून बकुसगाव येथील एका पत्र्याच्या शेड मध्ये एकूण सात जण जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, वहाने असा एकूण 6 लाख 36 हजार 810 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यावरून कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून (Kamshet) याचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अंकुश नायकुडे, पोलीस नाईक राजू लांडे, पोलीस शिपाई अंकुश पवार, पोलीस शिपाई अमोल ननवरे,पवन डोईफोडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.