Akurdi News : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ पुन्हा भाजपमध्ये

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ (Akurdi News) यांनी आज (गुरूवारी) पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ओव्हाळ यांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 21 एप्रिल 2019 रोजी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पोटनिवडणुकीच्या धामधूमीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Chinchwad : जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सोडत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेखर ओव्हाळ यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप (Akurdi News) आदी उपस्थित होते.

शेखर ओव्हाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गुरूवारी प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे रावेत-किवळे भागात भाजपची ताकद वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.