Chinchwad Bye-Election : बंडखोर उमेदवाराला भाजपने उभे केले नाही – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bye-Election) शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना भाजपने उभे केले नाही. आम्ही कोणाला बोललो नाहीत. बंडखोरीशी आमचा काही संबंध नाही. त्यांची लढाई ते लढत आहेत. याला उभे करा, त्याला पाडा, हा आमचा व्यवसाय नाही. बंडखोरीचा फायदा-तोटा कोणाला होईल. यामध्ये आम्हाला काही रस नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शहरात आले होते. आकुर्डीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, प्रवक्ते एकनाथ पवार, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, माजी महापौर उषा ढोरे, नामदेव ढाके यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, दिवंगत आमदाराच्या कुटुंबातील उमेदवार असल्याने आणि आमदारकीचा (Chinchwad Bye-Election) सव्वा वर्षाचाच कालावधी असल्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला विनंती केली. पण, त्यांनी मान्य केली नाही. चिंचवडची निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढत आहोत.

Akurdi News : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ पुन्हा भाजपमध्ये

भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या पाठिशी केंद्र, राज्यातील डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे चिंचवडच्या विकासाला गती येईल. चिंचवडची जनता मतांचे कर्ज देईल आणि भाजपचा ऐतिहासिक विजय होईल.

भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत आहे. भाजपवर भ्रष्टाराचे आरोप करणा-यांनी स्वत:चे चेहरे आरशात बघितले पाहिजेत. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता अशी ज्यांची विचारधारा आहे. ते आमच्या विचारधारेशी बरोबरी करु शकत नाहीत.

विरोधकांच्या आरोपात काही तथ्य नाही. ती विचारधारा आमची नाही. ती विचारधारा विरोधकांची आहे. सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता हे त्यांनी केले. त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यायचे हे जनता ठरवेल.

शहर भाजपने एक लाखाच्या मतांच्या फरकाने भाजपचा विजय होईल असा दावा केला आहे. भाजपचे मताधिक्य किती असेल याबाबत विचारले असता ते म्हणाले, किती मतांनी निवडून येवू हे जनतेवर सोडले पाहिजे. केवळ ऐतिहासिक विजय होईल. एवढेच बावनकुळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.