Chinchwad Bye-Election : …म्हणून ‘वंचित’चा राहुल कलाटे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bye-Election) वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कलाटे यांची ताकद वाढली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीनेही वंचितकडे पाठिंब्याची मागणी केली होती. पण, वंचितने मागीलवेळी प्रमाणे कलाटे यांच्या पाठिशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी फेसबुक पेजवर पाठिंब्याचे पत्र पाठविले आहे. त्याक ठाकूर यांनी म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाली.

कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे असं दिसतंय. परंतु, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खर्गे यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा असे विनंती पत्र आलेले (Chinchwad Bye-Election) नाही. आणि म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.

पहाटेच्या शपथविधी नंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशिर्वाद होता असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीजेपी बरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही.

Chinchwad Bye-Election : बंडखोर उमेदवाराला भाजपने उभे केले नाही – चंद्रशेखर बावनकुळे

चिंचवड मध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.‌ आणि त्यांनी 1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु, तसे घडले नाही.

गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडी मध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून बीजेपीला पिपरी-चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले. तर, राहुल कलाटे थांबवू शकतात या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड मधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.