Pune: पुणे लोकसभा निवडणुकीला आता येणार रंगत; वसंत मोरे यांच्या उमेदवारीचा मोहोळ आणि धंगेकर यांना धसका 

एमपीसी न्यूज – वंचित बहुजन आघाडीतर्फे मनसेचे माजी नेते वसंतराव मोरे यांना  (Pune)उमेदवारी मिळाल्यावर आता पुणे लोकसभा निवडणुकीला आता खरी रंगत येणार आहे. या उमेदवारीचा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी धसका घेतला आहे. 
पुणे लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि माहायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मोरे यांनी 100 टक्के निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते.

कोणत्याही परिस्थितीत एकतर्फी निवडणूक होणार नासल्याचा दावा मोरे   (Pune)यांनी केला आहे.
यंदाच्या पुणे लोकसभा निवडणुकीत पुणे महापालिकेच्या 3 नगरसेवकांमध्ये लढत होणार आहे. हे तिन्ही नगरसेवक सभागृहात पुणेकरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळेच राजकीय पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. वसंतराव मोरे यांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन आपली दिशा स्पष्ट केली आहे. मराठा समाजाच्या बांधवांशीही त्यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे मोहोळ, धंगेकर आणि मोरे अशी तिरंगी लढत पुण्यात होणार आहे. मोहोळ आणि धंगेकर यांच्या उमेदवारीला स्व पाक्षातूनच विरोध होत आहे. मात्र, हा विरोध लवकरच थांबणार असल्याची कुजबुज सुरू आहे.

शरद पवार यांनी धंगेकर यांच्याशी झालेल्या चर्चेत माजी गटनेते आबा बागुल लवकरच तुमच्या प्रचाराला लागणार असल्याचे सांगितले. तर, दुसरीकडे राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे यांचीही नाराजी लवकरच दूर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.