Pune : परिचारिकांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही : नीता अहिरराव

एमपीसी न्यूज – नर्सिंग व्यवसायात परिचारिका घेत असलेल्या रूग्णांच्या वैयक्तिक काळजीची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही, असे मत जहांगीर रुग्णालयाच्या (Pune) मुख्य नर्सिंग सुपरिटेंडंट नीता अहिरराव यांनी व्यक्त केले.
डीईएस सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंगचा सोळावा लॅम्प लायटिंग समारंभ महापालिकेच्या वैद्यकीय उपाधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांच्या हस्ते संपन्न झाला. जहांगीर रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सुपरिटेंडंट नीता अहिरराव यांची प्रमुख उपस्थिती होती. डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्या शारदा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.सोनाली गोरे, शीतल ठाकूर, महिमा मेश्रामकर, स्नेहल बदक, आसिफ शेख, प्रथमेश आंबुरे या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा (Pune) या वेळी गौरव करण्यात आला.

Pune: पुणे लोकसभा निवडणुकीला आता येणार रंगत; वसंत मोरे यांच्या उमेदवारीचा मोहोळ आणि धंगेकर यांना धसका 

डॉ. कल्पना बलिवंत  म्हणाल्या की, रुग्ण आणि नर्स यांच्यामध्ये निर्माण झालेल्या भावनिक नात्यामुळे आजारपणातून लवकर बरे होण्यास मदत होते. कोणत्याही रुग्णाला आपल्याला लवकरात लवकर बरे व्हावे असे वाटत असते  आणि त्यासाठी रुग्णालयातील सर्व स्टाफ मनापासून रुग्णांची सेवा तत्परतेने बजावत असतो. चोवीस तास रुग्णालयात थांबून परिचारिका रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा पुरवित असतात.

नर्सिंग व्यवसायाची तुलना अन्य कोणत्याही व्यवसायाशी होऊ शकत नाही. या व्यवसायात अर्थाजन होतेच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांच्या  सेवाभावामुळे त्यांना आत्मिक समाधान  मिळते असे डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.