Akurdi News : ब्राह्मण ऑर्गनायझेशन फॉर नेटिव्ह डेव्हलपमेंट (बाॅंड) तर्फे शनिवारी औद्योगिक प्रदर्शन

एमपीसी न्यूज – ब्राम्हण ऑर्गनायझेशन फॉर नेटिव्ह डेव्हलपमेंट (बाँड) च्या वतीने उद्या (शनिवारी) आकुर्डी (Akurdi News ) प्राधिकरण येथील पाटीदार भवनमध्ये ‘बाँड इंडस्ट्रिअल एक्स्पो’ हे औद्योगिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
‘बाँड इंडस्ट्रिअल एक्स्पो’ची वेळ साधारण दुपारी 2 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. या उपक्रमाला अधिक ऊर्जा देण्यासाठी, बाॅंड वाणिज्य लिमिटेडने सदस्यांसाठी 15 एप्रिल 2023 रोजी पाटीदार सभागृह, सेक्टर 26, आकुर्डी प्राधिकरण, पुणे 44 येथे प्रदर्शनासह औद्योगिक परिषद आयोजित केली आहे.
इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमेशन आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना हे प्रदर्शन खुले आहे. सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, संभाजीनगर, नाशिक, ठाणे, बडोदा या बरोबरच पुणे जिल्ह्यातून उद्योजकांचे नेटवर्क असणार आहे. प्रत्येक उद्योजकाला स्वतःचे प्रेझेंटेशन गुंतवणूकदारांसमोर आणि बँकांसमोर दाखवण्याची संधी मिळणार आहे.

बाँडचा मूळ हेतू म्हणजे ब्राह्मण समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास. बाॅंड वाणिज्य लिमिटेड ही बाँडची संस्था आहे. ही संस्था ब्राह्मण उद्योजकांच्या आर्थिक विकासावर स्वतःचे लक्ष केंद्रित करते. सदस्यांसाठी मार्केट विकसित करणे, आर्थिक मदत करणे, मनुष्यबळ पुरवणे आदी कामे करतात.
बाॅंड वाणिज्य लिमिटेडचे म्हणणे आहे की, ब्राह्मण युवकांनी उद्योजक होऊन नोकरी शोधण्यापेक्षा नोकऱ्या द्याव्या. बाॅंडने आजपर्यंत 5000 पेक्षा जास्त ब्राह्मण उद्योजकांना मदत केली आहे. ते महाराष्ट्र व देशाच्या सर्व भागांमध्ये स्वतःच्या कार्याची व्याप्ती (Akurdi News ) सक्रियपणे वाढवत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.