Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात उत्साहाचे वातावरण

एमपीसी न्यूज – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त पिंपरी शहर फुलून गेले आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळयाला आभिवादन करण्यासाठी  (दि. 14) मोठी गर्दी दिसून येत आहे.

महामानवास अभिवादन करण्यासाठी शहरातील चौका चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बाबासाहेबांना आभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने पांढऱ्या, निळया रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे परिसर भीममय झाला आहे.

Kasarwadi : क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

 

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा शहरातील मुख्य चौक आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आहे.(Pimpri) तसेच या परिसरात महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे शुक्रवारी संपूर्ण शहरातील आंबेडकरी अनुयायांनी पिंपरी चौकात हजेरी लावली. जयंती निमित्ताने पिंपरी चौकात हजारो नागरिक आभिवादनासाठी येत आहे. त्यामध्ये चौकात बाबासाहेबाचे मोठया आवाजात डिजेवर भीम गीतांचा जलसा सुरू आहे.

 

पिपंरी चौक परिसरात मागच्या बाजुला देखील बाबासाहेबांवर विविध गीते सादर केली जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.(Pimpri) आभिवादनासाठी आलेल्या नागरिकांसाठी पाणी, जेवण, सरबत देण्यात येत आहे. तसेच जयंती असल्यामुळे चौकातील परिसरात मोठी यात्रा भरली. या यात्रेमध्ये डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमा, शिल्पे, बिल्ले तसेच निळया रंगांच्या झेंड्यांनी परिसरात आंनदाचे वातावरण दिसून येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.