Pimpri : सोहम सार्वजनिक ग्रंथालयात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

एमपीसी  न्यूज -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Pimpri ) यांच्या 132 व्या जयंती सोहळा सोहम सार्वजनिक ग्रंथालय मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आला त्याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण शेठ सुवर्णा  ,राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर युवा अध्यक्षा वर्षा जगताप , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी मनोगत व्यक्त केले त्यात ते म्हणाले.
माझी महापौर योगेश बहल, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे,आमदार अश्विनी जगताप, गौतम चाबूकस्वार, आमदार.सुजाताताई पालांडे, नगरसेविका.सुलक्षणा धर , नगरसेवक शाम आण्णा  लांडे यांचे ग्रंथालयाला सहकार्य लाभले असून  महापुरुषांचे मोठे मोठे पुतळे उभे न करता ठीक ठिकाणी ग्रंथालय व अभ्यासिका स्थापन कराव्यात गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्थान देऊन मार्गदर्शन करावे .

मोठ मोठ्या  आवाजात डीजे वाजवून हिडीस नृत्य करणे, हावभाव करणे या अशा गोष्टी त्या महापुरुषांचा कोणता संदेश देऊ इच्छिता याचा समाजाने व तरुणांनी जरूर विचार करावा वर्षा जगताप यांनी सुद्धा पुढील प्रमाणे विचार प्रकट केले सोहम अभ्याससिकेचे व ग्रंथालयाचे कार्य पिंपरी चिंचवड शहरासाठी आदर्श आहेच , तसेच पुणे जिल्ह्यासाठी सुद्धा उत्कृष्ट ग्रंथालय व अभ्यासिका म्हणून आदर्शवत आहे किरण शेठ सुवर्णा यांनी सुद्धा पुढील प्रमाणे विचार प्रकट केले सोहम अभ्यासिकेतून अनेक अधिकारी घडत आहेत.
त्याचबरोबर तो माणूस म्हणून ही घडवला जात आहे ही समाधानाची बाब आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्पर्धा ( Pimpri ) परीक्षांचे विद्यार्थी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रदीप बोरसे यांनी केले कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व आभार प्रकट ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.