Alandi : आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा मुख्याधिकारी केंद्रे यांचे कडून गौरव

एमपीसी न्यूज -माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत “पर्यावरण पुरक गणेशोत्सव उपक्रम 2023”,आयुष्यमान (Alandi)भारत गोल्डन कार्ड नोंदणी अभियान यशस्वी रित्या राबविल्याबद्दल आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे मार्फत सर्व अधिकारी,कर्मचारी आणि रेशन दुकनदार यांना प्रशस्ती पत्र देउन गौरविण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान 4.0 पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमा अंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने (Alandi)शहरात पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करणेबाबत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.

तसेच शहरात एकुण 6 ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र उभारून सुमारे 10,000 गणेश मूर्ती संकलित करून त्या पुनर्वापराकरिता सामाजिक संस्थाना सुपूर्द करण्यात नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने उल्लेखनीय कामगिरी केली होती.भविष्यात देखील चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा मिळावी या हेतूने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी,कर्मचारी यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

Maval : नवनिर्वाचित सरपंचांचा राष्ट्रवादीकडून सत्कार

तसेच आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणी करिता आळंदी नगरपरिषद मार्फत रेशन दुकानदार यांच्या सहकार्यातून शहरात मोठं अभियान राबवून 5 दिवसात एकुण 2200 नागरिकांची नोंदणी करणेत आली. हे अभियान यशस्वी रित्या राबविण्यात उल्लेखनीय कामगिरी केलेबाबत शहरांतील रेशन दुकादार मंगला वेळकर,अमित उगले,अनिल कुऱ्हाडे,दयानंद तोडकर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सदर सत्कार समारंभ कार्यक्रम आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन गायकवाड यांनी केले तसेच सूत्रसंचालन किरण आरडे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.