Nigdi : दुर्गादेवी टेकडीवर मोरांचा मुक्त संचार

एमपीसी न्यूज –   पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडीतील दुर्गादेवी टेकडी उद्यानात(Nigdi )मोराची जोडी मुक्‍त संचार करताना नागरिकांना दिसून येत आहे. मोरांनी फुलवलेल्या पिसाऱ्याचे हे विलोभनीय दृश्‍य पालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये टिपले आहे.  
महापालिकेच्या वतीने शहरात दोनशे पेक्षा अधिक उद्याने विकसित (Nigdi)केली आहेत. या उद्यानांमध्ये नागरिक सकाळी मॉर्निंग वॉक आणि सायंकाळी फिरण्यासाठी येतात. निगडी, प्राधिकरण परिसरात महापालिकेने दुर्गादेवी टेकडी विकसित केली आहे. या टेकडीवर मोठ्या प्रमाणात देशी वृक्षासह विदेशी वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे.

Pune : पाच हजारांची लाच स्विकारताना पुरंदर तालुक्यातील तलाठ्याला रंगे हात अटक

दुर्गादेवी टेकडीवर विविध पक्षांचे वास्तव्य आहे. गेल्या काही वर्षांपासून या घनदाट वृक्षांमध्ये मोरांचा वावरही सातत्याने आढळून येत आहे. नुकताच मोराच्या जोडीचा उद्यानात मुक्त संचार दिसून आला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.