Pimpri Chinchwad : शालेय वयात चांगल्या संस्कारांची नितांत गरज असते- डॉ.दिलीप गरुड

एमपीसी न्यूज -“मित्र व परिवाराच्या प्रभावातून भविष्यकाळाची (Pimpri Chinchwad)पायाभरणी होते. चांगली संगत आणि चांगले विचार यामुळे आयुष्याला आकार मिळतो, म्हणूनच शालेय वयात चांगल्या संस्कारांची रुजवण नितांत गरजेची आहे”. असे प्रतिपादन ज्येष्ठ बालसाहित्यिक व कथाकथनकार डॉ दिलीप गरुड यांनी केले.

पीसीएमसी पब्लिक स्कूल रहाटणी, या शाळेच्या सत्रांत समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष(Pimpri Chinchwad) नरेंद्र सुराणा हे होते. तसेच मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले, शोभा घावटे, साहेबराव धुमाळ, अर्चना कांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या पहिल्या सत्रामध्ये विविध दिनविशेषानिमित्ताने मूर्ती तयार करणे, राखी तयार करणे, चित्रकला, पौष्टिक डबा, हस्ताक्षर, पाठांतर अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

Pune : पाच हजारांची लाच स्विकारताना पुरंदर तालुक्यातील तलाठ्याला रंगे हात अटक

त्याचा बक्षीस वितरण समारंभ पाहुण्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डॉ गरुड यांनी प्रदूषण विरहित फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला, तसेच ‘संगतीचे फळ’ ही कथा कथन केली. कथेतील प्रसंगनाट्याने उपस्थित भारावून गेले.


चौगुले यांनी आपल्या मनोगतात,,’ चांगुलपणाचा गौरव हा व्यक्तीच्या सद्गुणांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो, त्यामुळे व्यक्तीविकास घडतो. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर पवार व अनिल सुकाळे यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली वेदपाठक यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.