Alandi : गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – आळंदी शहरात 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान (Alandi)गीता भक्ती अमृत महोत्सव कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक व्हीआयपी भेट देणार आहेत.

तसेच दररोज 30 ते 35 हजार भाविक उपस्थित (Alandi)राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत.

दिघी आळंदी/चाकण वाहतूक विभाग

इंद्रायणी घाट ते चाकण चौक जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
पर्यायी मार्ग- इंद्रायणी नगर कमान काटे पाटील चौक नवीन पुल मार्गे जाता येईल.

इंद्रायणी नगर कमान ते काटेपाटील चौक एकेरी वाहतूक सुरु राहील

काटे पाटील चौक ते इंद्रायणी घाट मेन रोड सर्व वाहनांना प्रवेश बंद
पर्यायी मार्ग – काटे पाटील चौक नवीन पुल मार्गे जाता येईल

घुंडरे पाटील चौक ते बापदेव चौक दरम्यान सर्व वाहनांना बंदी
पर्यायी मार्ग- इंद्रायणी हॉस्पीटल मार्गे. गोपाळपुरा मार्गे. चाकण चौक मार्गे जाता येईल.

चिंबळी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील
पर्यायी मार्ग – भारतमाता चौक- हवालदार वस्ती देहूफाटा चौक चहोली फाटा चौक मार्गे. जयगणेश साम्राज्य चौक खडी मशीन रोड अलंकापुरम चौक मार्गे.

आळंदी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे जाण्यास जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील.
पर्यायी मार्ग – भारतमाता चौक हवालदार वस्ती देहूफाटा चौक चहोली फाटा चौक मार्गे. जयगणेश साम्राज्य चौक खडी मशीन रोड अलंकापुरम चौक मार्गे.

माझगाव फाटा चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील.
पर्यायी मार्ग – भारतमाता चौक मार्गे जाता येईल.

देहूफाटा चौक कडून आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील.
पर्यायी मार्ग – हवालदार वस्ती मार्गे. च-होली फाटा मार्गे.

चाकण शिक्रापुर रोड, रसिका हॉटेल येथून आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील.
पर्यायी मार्ग – शिक्रापुर रोड मार्गे. चाकण मोशी मार्गे. कोयाळी मरकळ मार्गे.

आळंदी शहरामधे कार्यक्रमाचे अनुषंगाने चाकण चौक ते इंद्रायणी हॉस्पीटल पर्यंत तात्पुरते स्वरुपात वाहने पार्किंग थांबवण्यास मनाई आहे. वरील मार्गावर पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक, पेट्रोल, डिझेल टँकर, पीएमपीएमएल बसेस, स्कुल बस यांना सवलत देण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.