Pune : राज्यसभेत प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी मिळणार का?

एमपीसी न्यूज – आगामी राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देताना प्रकाश जावडेकर(Pune) आणि वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप नेते गिरीष बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्तच आहे.

अशातच पुण्याचे प्रकाश जावडेकर आणि वंदना चव्हाण राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. सध्या राज्यात शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांचे उमेदवार सहजरीत्या विजयी होऊ शकतात.

त्याउलट शिवसेना (उध्दव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना (Pune)उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसकडे एक उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मत आहेत.

Alandi : गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत वाहतुकीत बदल

पुणे शहरातील दोन खासदार कमी होत असल्याने पुण्यातून एकाला तरी राज्यसभेवर संधी मिळावी, अशी स्थानिकांची जोरदार मागणी आहे. भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक मते असल्याने भाजपकडून पुण्यातील उमेदवाराला संधी देण्याची क्षमता आहे. भाजपचे सुनील देवधर यांनी त्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली असली, तरी त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद केंद्रीय नेतृत्वाकडून मिळत नसल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देवधर प्रबळ इच्छुक आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.