Pune :प्रमुख मागण्यांसाठी महापालिका आयुक्तांची घेतली भेट – दीपक मानकर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील प्रमुख मागण्यांसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार(Pune) यांची भेट घेतली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली.

पुणे मनपा निवृत्त प्राथमिक शिक्षण सेवकांचा निवृत्ती हप्ता देणे तसेच समाज विकास विभागातील उर्वरित सेवकांना कायम करण्यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. या प्रमुख मागण्यांसाठी सत्यात्याने पाठपुरावा केला जात असून आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असेही मानकर यांनी सांगितले.

Alandi : गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत वाहतुकीत बदल

दरम्यान, पुणे माहापालिकेवर प्रशासकीय राज सुरू (Pune)आहे. त्यामुळे नगरसेवकांना कामे करण्यास अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मानकर यांनी आयुक्तांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

पुणे शहरातील समस्या सोडविण्यासाठी दीपक मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत सातत्याने बैठका घेत आहेत. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना समस्या सोडविण्यासाठी मदत होत आहे. राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असल्याने पुण्यातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी लाभ होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.