Alandi : बँक खात्याच्या गोपनीय माहितीद्वारे 28 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून एका महिलेची 28 हजार 800 रुपयांची फसवणूक करण्यात आली. (Alandi) ही घटना 20 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या बँक (Alandi) खात्याची गोपनीय माहिती संगणकाच्या माध्यमातून काढून घेतली. त्यानंतर फिर्यादी यांच्या युपीआय आयडी द्वारे दोन हजार रुपये, 21 हजार 800 रुपये आणि पाच हजार रुपये असे तीन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पैसे घेत फिर्यादीची फसवणूक केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Chinchwad : मित्रपक्षांसोबत एकजुटीने लोकसभा लढू… महाविजय मिळवू! – चंद्रशेखर बावनकुळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.