Chinchwad : मित्रपक्षांसोबत एकजुटीने लोकसभा लढू… महाविजय मिळवू! – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा क्षेत्रात सुमारे 350 हून अधिक घरी जाण्याचा आमचा संकल्प आहे. एकूण 11 राजकीय पक्षांची महायुती आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 जागा प्रचंड बहुमताने जिंकेल. सर्वच बूथवर आम्हाला 51 टक्के मते मिळतील. निवडणुकीत ज्या पक्षांकडे जागा जातील, त्या प्रत्येक ठिकाणी भाजपा आणि मित्रपक्ष एकजुटीने लढून विजय मिळवू, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

पिंपरी- चिंचवड शहर भाजपाच्या वतीने ‘महाविजय- 2024’ अंतर्गत ‘घर चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजप,प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, , प्रभारी वर्षा डहाळे, सदाशिव खाडे, माऊली थोरात, राजेश पिल्ले, गणेश भेगडे, अनुप मोरे, अमित गोरखे, काळूराम बारणे, विकास डोळस, नामदेव ढाके, विलास मडेगिरी, शीतल शिंदे, अजय पाताडे, संजय मंगोडीकर, शैला मोळक, तुषार हिंगे, सुजाता पालांडे, रवींद्र भेगडे तसेच भाजपा सर्व मा.नगरसेवक, मा.नगरसेविका, पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पेजप्रमुख, युवा वॉरियर्स उपस्थित होते.

बावनकुळे यांनी पिंपरी-चिंचवड येथे मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघांतील ‘भाजपा वॅारियर्स’ शी संवाद साधला. ‘घर चलो अभियान’ अंतर्गत पिंपरी, राधिका चौक येथून अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, शगुन चौक व साई चौक परिसरातील‍ नागरिकांची भेट घेतली. यावेळी नागरीकांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशी संवाद साधला.

‘नारीशक्ती वंदन’ या विषयावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठीचे आरक्षण विधेयक पास करून घेतले आहे. देशावर जेव्हा संकट आले, तेव्हा महिलांनी कणखरपणा दाखविला. आता देखील लोकसभेत 191, तर विधानसभेत सुमारे 100 महिलांना संधी मिळणार आहे.

राम मंदीर उभारले… आता कसं वाटतंय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राममंदीर संदर्भातील सर्व अडथळे दूर केले व गतवर्षीपासून भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाल्याचे सांगितले. सन 2024 च्या जानेवारी महिन्यात हे मंदीर सर्वांसाठी खुले होणार आहे.

यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, ज्यावेळी आम्ही राममंदिरासाठी भांडत होतो, त्यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी लाल कृष्ण आडवाणी यांना ‘मंदिर वही बनाएंगे, मगर तारीख नाही बताएँगे’असे म्हणताना टिंगल केली होती. त्या कॉंग्रेसच्या नेत्यांना ‘आता कसं वाटतंय’ असे म्हणत चिमटा काढला.

IND vs AFG : रोहित शर्माची दमदार खेळी, भारताचा सलग दुसरा विजय
केंद्र सरकारच्या उपलब्धीची उजळणी

घर चलो अभियानाच्या समारोपाच्या छोटेखाणी सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या वतीने मागील 9 वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची आठवण करून दिली.

यामध्ये तीन तालाख, राममंदीर, नारी शक्ती वंदन, नुकतीच सुरु झालेली विश्वकर्मा योजना आदी विषयांचा धावता आढावा यावेळी बावनकुळे यांनी घेताना उपस्थितांना त्यानी केलेल्या मतदानामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगितले.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे जोरदार स्वागत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज शहरात शहर भाजपाच्या ‘घर चलो’ अभियानासाठी आले होते. त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

यावेळी शहरातील महिला कार्यकर्त्यानी देखील भगवे फेटे बांधताना अभियानाचा उत्साह वाढविला. शहर भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सुमारे 30 फुटांचा हार देखील घालण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.