Alandi : आर्ट ऑफ हॅपिएस्ट लिव्हींग शिबिरात आळंदीकरांनी घेतले आनंदी जीवन जगण्याचे धडे

एमपीसी न्यूज – रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपणास अनेक (Alandi) समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शांत राहून निर्णय कसे घ्यावेत. छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद कसा शोधावा. नाते संबंध अधिक दृढ बनवावेत याकरिता श्री श्री ज्ञान विकास केंद्राच्या आर्ट ऑफ हॅपीएस्ट लिव्हींग शिबिरात आळंदीकरांनी गुरुमंत्र घेतला.

Maval : धामणे येथे सहा हजार झाडांचे वृक्षारोपण

माजी नगरसेविका विनया प्रदिप तापकीर यांच्यावतीने आळंदी येथे श्री.श्री. ज्ञान विकास केंद्र Art of Happiest Living तर्फे ब्रह्मर्षि विशालजी यांचे नि:शुल्क योगा आणि प्राणायाम शिबीर आयोजित केले होते. हे शिबीर 17 ते 23 जुलै या सात दिवसाच्या कालावधीत संकल्प गार्डन, पुणे आळंदी रोड, साई मंदिराजवळ पार पडले.

श्री श्री  ज्ञान विकास केंद्र (Art of Happiest living) तर्फे ब्रह्मर्षि विशालजी यांनी या सात दिवसात नागरिकांना मार्गदर्शन केले. हे शिबिर पुर्णपणे मोफत होते.

ब्रह्मर्षि विशालजी यांनी आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या आठ गोष्टींवर भर देण्यास सांगितला जेणे करून  आपले आयुष्य आणखी सोपे व आनंदी बनेल त्या पुढील प्रमाणे-

1)  चिंता आणि तणाव मुक्त जीवन कसे जगावे

2)  चिडचिड व रागावर नियंत्रण

3)  आळसापासून मुक्ती व कार्य क्षमतेमध्ये प्रगती

4)  पती-पत्निमधे असलेला तणावापासुन मुक्ती, एकमेकाप्रति सामंज्यस्य कसे वाढवाल.

6)  फक्त शारीरीक नव्हे तर मानसिक व बौद्धिक तंदुरुस्ती कशी वाढवावी.

7)  प्रत्येक क्षणी प्रसन्न कसे राहाल.

8)  स्मरणशक्ती कशी वाढेल.

या शिबिरामध्ये योगा, प्राणायाम, ध्यानधारणा, संगीत, नृत्य यांचा समावेश केलेला होता. तसेच हे शिबिर शरीर स्वास्थ्यावर संपूर्ण केंद्रित होते. योगासने, प्राणायाम, ध्यान व व्यायाम चिकित्साद्वारे शरीरातील विषयुक्त घटक बाहेर काढून दीर्घ आरोग्य कसे मिळवता येईल व ताणतणावरहित जीवन कसे जगता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले.

श्री श्री ज्ञान विकास केंद्र Art of Happiest Living, ही संस्था जनसामान्यामध्ये आनंदी जीवन जगण्याची कला वृद्धिगत व्हावी, शारीरिक स्वास्थ्य व तंदुरुस्ती वाढावी यासाठी विविध देशांमध्ये कार्य करते. या अंतर्गत हा 7 दिवसांचा कोर्स घेतला (Alandi) जातो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.