Alandi : आळंदी मध्ये डोळे लागण संख्येत वाढ ; नवीन रुग्ण संख्या 370

एमपीसी न्यूज – काल दि.31 जुलै रोजी आळंदीमध्ये डोळे लागण  रुग्णांच्या संख्येत (Alandi) काही प्रमाणात वाढ दिसून आली.आळंदी शहरातील शाळा व संस्थांमध्ये दुबार मुलांची तपासणी चालू आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी यांच्या मार्फत घरोघरी सर्वेक्षण चालू आहे.

दि.31 रोजी पर्यंतची एकूण सर्वे केलेली संख्या 200015 (शाळा आणि संस्था विद्यार्थी 154152) , गृहभेटी  संख्या 45863 ,  (कालची) नवीन रुग्ण संख्या 370, आत्तापर्यंत चे बाधित रुग्ण 8768, आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 7627  इतकी आहे.याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी (Alandi) दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.