Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी ‘करीयर गाईडन्स’

एमपीसी न्यूज – कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी करीयर गाईडन्स व समुपदेशन (Talegaon Dabhade) सत्र घेण्यात आले. व्हर्टीकल लिमिट क्लासेस यांच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. 28) हा कार्यक्रम घेण्यात आला. आपल्या पाल्याला दहावी नंतर कोणत्या अभ्यासक्रमासाठी पाठवणे योग्य आहे. मुलांचा शैक्षणिक आणि बौद्धिक कल समजून घेत त्यांना शिक्षण दिले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Alandi : आळंदी मध्ये डोळे लागण संख्येत वाढ ; नवीन रुग्ण संख्या 370

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका ज्योती नवले यांनी केले. यावेळी प्राध्यापक दिघ्नेश बरोट व प्राध्यापक प्रणय चौबल यांनी इयत्ता 8वी व 10 वीत असतानाच अभ्यासाचा पाया भक्कम  कसा करावा व JEE, NEET यासारख्या परीक्षेसाठी कशी तयारी करावी , यावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच प्राध्यापक मिलिंद गंभीरे यांनी परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचा पाया भक्कम होण्यासाठी कृतियुक्त व प्रकल्प आधारीत शिक्षण यावर भर देणे गरजेचे आहे, असे सांगितले. त्याचबरोबर कष्ट करण्याची सवय प्रत्येक विद्यार्थ्यास असावी, असेही समुपदेशन त्यांनी पालक व विद्यार्थ्यांस केले. विद्यार्थ्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी या परिसंवादाचे आयोजन केले होते.

या परिसंवादास पालक बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच  शाळेतील सर्व शिक्षक सहभागी होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे,खजिनदार गौरी काकडे व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर उपस्थित होत्या.

शाळेच्या शिक्षिका सौ. अनुजा चिटणीस  यांनी आभार (Talegaon Dabhade) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.