Vadgaon : शहराच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपनगराध्यक्षांनी घेतली नवनिर्वाचित पोलीस निरीक्षकांची भेट

एमपीसी न्यूज – वडगाव मावळचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची मनसेच्या विद्यमान उपनगराध्यक्ष सायली रुपेश म्हाळसकर आणि शहर पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने भेडसावणाऱ्या अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी ‘करीयर गाईडन्स’

प्रामुख्याने वडगाव शहरातील अनिर्बंध पार्किंग व त्यावरील उपाययोजना, शहरातील दैनंदिन होणारी वाहतूक कोंडी व उपाययोजना करण्यासाठी वडगांव नगरपंचायत, व्यापारी, पोलिस प्रशासन यांची एकत्रित चर्चा घडवून आणणे, वडगाव शहरात कायदा सुव्यस्था आबाधित राहावी .

तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा व त्यावर वचक ठेवण्यासाठी शहरातील सर्व चौकात- सीसीटिव्ही कॅमेरे बसविणयासाठी नगरपंचायतकडे आग्रह धरण्यात यावा. विविध विकासकामे करतांना येणारे अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य करणे.

यांसारख्या विषयांवर चर्चा झाली तसेच वडगाव शहरासाठी तब्बल एका वर्षानंतर नव्या महिला उपनिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या ऋतुजा मोहिते यांची देखील भेट घेऊन त्यांचे स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शहरातील महिला व बालकांच्या दृष्टीने संरक्षणात्मक कारवाई व उपायोजना या विषयावर देखील चर्चा करण्यात आली.

यावेळी मावळ मनसेचे नेते तानाजी तोडकर वडगाव शहर अध्यक्ष मच्छिंद्र मोहिते, महिला शहराध्यक्ष अर्चना ढोरे, पक्षनेते संतोष म्हाळसकर, दिनेश म्हाळसकर, विकास साबळे देखील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.