Alandi News : एन एस एस युनिटच्या विद्यार्थ्यांमार्फत इंद्रायणी घाटाची स्वच्छता

एमपीसी न्यूज : आळंदी येथे आळंदी नगरपरिषदेच्या (Alandi News) मार्गदर्शनाने माझी वसुंधरा अभियान 3.0 ,व नमामी चंद्रभागा अभियाना अंतर्गत इंद्रायणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती.

या निमित्ताने चला जाणूया नदीला या उपक्रमात 17 डिसेंबर रोजी सकाळी साडे आड ते साडे दहा वा. एन एस एस  युनिट A 157 लोहगाव येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान द्वारे तसेच नेचर फाऊंडेशन,नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान,जनहित फाऊंडेशन, आळंदी नगरपरिषद यांच्या वतीने महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्थळ व नदीघाट परिसर स्वच्छ करून पाण्याने धुवून घेण्यात आला.

Alandi : महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आळंदीमध्ये शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध

यावेळी नदी घाट परिसरात स्वच्छते बद्दल जन जागृती करण्यात आली.यावेळी पालिका कर्मचारी मालन ताई पाटोळे, हनुमंत लोखंडे,भागवत काटकर,अर्जुन मेदनकर व (Alandi News) विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.स्वच्छता अभियानातील विद्यार्थ्यांचा माऊली मंदिरात श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.