MVA Mahamorcha : महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा; राज्यपालांची हकालपट्टी करा अन्यथा…शरद पवार कडाडले

एमपीसी न्यूज : महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी राज्यात आज महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी झाले होते. कर्नाटक असो वा आणखी इतर शक्ती असो, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत, महाराष्ट्राचे लचके तोडत आहेत, त्यामुळे या महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार (MVA Mahamorcha) असा निश्चय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तर राज्यपालांची हकालपट्टी लवकरात लवकर करा अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय रहाणार नाही असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला.

महामार्चाेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. ज्या वेळी या मोर्चाची घोषणा केली त्यावेळी तुम्ही चालणार का असा सवाल मला करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्या छाताडावर चालणार असल्याचं मी म्हणालो. मुंबईसह महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही.

आजच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रप्रेमी सामील झाल्याचं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच्या मोर्चात  महाराष्ट्रद्रोही सामील झालेले नाहीत. बाळासाहेबांचे विचार घेऊन जातोय असं म्हणणारं तोतया या मोर्चामध्ये नाहीत.राज्यपाल पद मोठं आहे, त्याचा आम्ही मान ठेवतो. पण राज्यपाल कोण असावा याचा विचार करावा. राज्यपाल महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करतात. त्यावर राज्याचे मंत्री महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई नसत्या तर आज या मंत्र्यासारखे वैचारिक दारिद्र आले असते.

राज्यातील सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आज एक तर वैचारिक दारिद्र असणारे किंवा महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मंत्री आहेत. मुंबईच्या पालकमंत्र्यांनी खोकेवाल्या सरकारची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेसोबत केली.(MVA Mahamorcha) चंद्रकांत पाटलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. एका मंत्र्याने सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. आता मुंबईचे लचके तोडले जात आहेत. अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळवले जात आहेत. आम्ही सत्तेत असताना अनेक प्रकल्प सुरु केले. पण यांनी बंद केले. सध्याचे मुंबईचे पालकमंत्री स्केअर फुटमध्ये बोलतात.

Moshi News : मोशी येथे 24 डिसेंबर रोजी भरणार इंद्रायणी साहित्य संमेलन

तर अजित पवार यांनीही आपल्या भाषणातून भाजप सरकार व ऱाज्यपालांचा खरपूस समाचार घेतला. आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले की, युगपुरुष शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. महाराजांच्याबाबत बेताल वक्तव्य करतात. यामागे मास्टरमाईंड कोण आहे? एकदा चूक झाली की माफी मागता येते, पण असे घडत नाही. राज्यपाल बोलले की मंत्री बोलतात आणि वारंवार बोलतात. यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, आज या उन्हात तुम्ही आले आहात तर राज्यकर्त्यांना धडकी भरेल. महापुरुषांविरोधात वक्तव्य करतात याबाबत बिल आणावे अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही भाष्य केलं. ते म्हणाले. राज्यात अडीच वर्ष आमचं सरकार होतं. याआधी आमचं सरकार असताना कधी बॉर्डरची गावं कर्नाटकात किंवा तेलंगणात जायचे असे बोलले नाही. भाजपला या महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत असा आरोप त्यांनी केला आहे

अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आणि सरकारच्या मनात धडकी भरवण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आहे. संकट महाराष्ट्रावर असते त्यावेळी अस्मितेसाठी महाराष्ट्र पेटून उठतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. पण, या राज्यात महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम होते यामागे कोण मारस्टरमाईंड आहे? संविधान आणि कायद्याचा विसर या सरकारला पडला आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.

शरद पवार काय म्हणाले ?

महाराष्ट्रातील महापुरुषांचे नाव आणि त्यांच्या कार्याचे देशभरात आदराने स्मरण केले जाते. मात्र, याच महापुरुषांबाबत राज्यपाल  वादग्रस्त वक्तव्य करतात(MVA Mahamorcha) त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय रहाणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला. महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागणार असल्याचे ते म्हणाले.

शिवाजी महाराज यांचं नावं आज साडे तीनशे वर्ष झाले तरी नावं अखंड आहे. त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. जर माफी मागितली गेली नाही तर हा तरुण शांत बसणार नाही, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

 

 सरकारने विरोधी पक्षांना भाषणही लिहून द्यावे; मोर्चावरील अटींवरून राऊतांचा हल्लाबोल

महामोर्चाचा उत्साह बघितल्यानंतर धडकी भरली असणार आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. तसेच राज्यपालांना हटवले पाहिजे, अशा पध्दतीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कायदा करावा लागला तर त्यासाठी अधिवेशनात सरकारला भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे. (MVA Mahamorcha) महाराष्ट्राला साधुसंताचा वारसा आहे, असे असताना हे का घडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मराठी भाषिकांवर हल्ले झाले, हा महाराष्ट्र हे कदापी सहन करणार नाही.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महापुरुषांचे अपमान होत आहे. सीमावाद प्रकरण पुढे आणले आहे असा आरोप करत आपण एकजूटता दाखवली पाहिजे, सरकारला जागा दाखवण्याचे काम करुया असा हल्लाबोल अजित पवारांनी सरकारवर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.