Pimpri News : बीआरटी बस थांब्यांसाठी उधळपट्टी सुरूच

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरामध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बीआरटी मार्ग उभारले आहेत. या मार्गावर सातत्याने लाखो रूपयांचा खर्च करण्यात येत (Pimpri News) असून आता पुणे-मुंबई या मार्गावरील बीआरटी मार्गावरील बसथांब्यातील विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी 34 लाखांचा खर्च केला जाणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये दापोडी ते निगडी, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता, नाशिक फाटा ते वाकड, सांगवी फाटा ते किवळे, बोपखेल ते दिघी, किवळे ते निगडी भक्ती-शक्ती चौक हे बीआरटी मार्ग आहेत. या मार्गावर बसथांबे उभारण्यात आले आहेत. पुणे- मुंबई मार्गावरील बसथांब्यांमधील विद्युत साहित्याची, तसेच बॅटरी व इलेक्‍ट्रिक देखभाल करण्यासाठी बीआरटी विभागाने निविदा प्रक्रिया राबवली. त्यामध्ये चार ठेकेदारांनी सहभाग घेतला.

MVA Mahamorcha : महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा; राज्यपालांची हकालपट्टी करा अन्यथा…शरद पवार कडाडले

44 लाख 63 हजार रुपयांच्या या निविदेमध्ये मे. विमलाई इलेक्‍ट्रिक कॉर्पोरेशन या ठेकेदाराने 23 टक्के कमी दराने 34 लाख 3 हजार रुपये दर सादर केला. (Pimpri News) त्यानुसार पुणे-मुंबई मार्गावरील बीआरटी मार्गावरील बसथांब्यातील विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी 34 लाख 3 हजार रुपये खर्च करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.