Alandi : एम.आय.टी. महाविद्यालयास गणिताचे संशोधन केंद्र सरू करण्यास मान्यता

एमपीसी न्यूज- आळंदी येथील एम.आय.टी. कला, वाणिज्य (Alandi ) आणि विज्ञान महाविद्यालयाला  गणित विषयाचे संशोधन केंद्र सरू करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून मान्यता देण्यात आली आहे.महाविद्यालय एम.एस.सी (इंडस्ट्रियल म्यॅथ्यमॅटिकस कम्प्युटर अँप्लिकेशन) सह संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, वाणिज्य व जनसंवाद पत्रकारिता, या स्वरूपाचे अनेक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात.

या संशोधन केंद्र मुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. गणितीय ज्ञानाच्या प्रगतीला आणि वास्तविक जगाच्या समस्यांसाठी नाविन्यपूर्ण उपायांना प्रोत्साहन देणे, संशोधकांना जटिल गणिती समस्यांचा सखोल अभ्यास करण्यास आणि विविध क्षेत्रांमध्ये व्यावहारिक अनुप्रयोग असलेले नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास सक्षम करणे व समाज आणि देशाच्या प्रगती मध्ये योगदान देणे, हा संशोधन केंद्रचा प्रमुखा उद्देश असेल असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी व्यक्त केले .

महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय , संगणक प्रयोगशाळा आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. या संशोधन केंद्राची स्थापना हे महाविद्यालयसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. असे मत गणित विभागाचे प्रमुख डॉ.प्रदीप पानसरे यांनी व्यक्त (Alandi )केले.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

Chakan : चाकण मधून 12 वर्षांच्या मुलाचे अपहरण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.