Pune : रयत संस्थेवर घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले-चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज- रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ( Pune ) उभारली.पण या संस्थेवर घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले.हे सर्वांनाच माहिती आहे.राज्यातील अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्थांच्या घटना बदलून शरद पवार हे अध्यक्ष झाले आहेत.अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

Alandi : एम.आय.टी. महाविद्यालयास गणिताचे संशोधन केंद्र सरू करण्यास मान्यता

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली रयत शिक्षण संस्थेची बैठक उद्या सातारा येथे होणार आहे.त्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रयत संस्थेवर घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत.अशी टीका केल्याने त्यावर शरद पवार हे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.