Alandi : पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान घडलेल्या घटनेसंदर्भात आळंदीकर ग्रामस्थांची बैठक

एमपीसी न्यूज – पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान घडलेल्या (Alandi) घटनेसंदर्भात डी डी भोसले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.15 रोजी समस्त आळंदी ग्रामस्थांची बैठक श्री भैरवनाथ मंदिरामध्ये पार पडली. काही  ठरावांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पालखी प्रस्थान सोहळ्या दरम्यान घडलेल्या घटनेत  स्थानिक युवक होते असे वक्तव्य केले होते. त्या खोट्या वक्तव्याला विरोध करत याबाबत योग्य खुलासा न केल्याने निषेध व्यक्त केला.  तसेच स्थानिक युवक नव्हते असा खुलासा केला नाही तर त्याबाबत तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि निषेध ठराव मंजूर केला जाईल अशी भूमिका डी डी भोसले पाटील यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मांडली.

यावेळी समस्त ग्रामस्थांनी आळंदी देवस्थानाने  ग्रामस्थांना दिलेल्या  वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.

तसेच समस्त ग्रामस्थांच्या मार्फत विश्वस्त नेमणुकी मध्ये तीन ग्रामस्थ व दोन वारकरी यांना विश्वस्त म्हणून संधी देण्यात यावी.कमिटीच्या विश्वस्त पदावर ग्रामस्थ विश्वस्त घेण्यात यावे.त्यामध्ये वारकऱ्याचा समावेश असावा.यावर सर्वांचे एकमत झाले.

प्रकाश कुऱ्हाडे ,संजय घुंडरे,साहेबराव कुऱ्हाडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Pune : पुण्यात पुढील काही दिवस तुरळक पावसाची शक्यता

प्रकाश कुऱ्हाडे यांनी आळंदीकर ग्रामस्थांची एकजूट राहणे किती गरजेचे आहे,हे सांगत याचा संत तुकाराम प्रस्थान सोहळ्यासारखी आळंदीतील पालखी सोहळा  सुरेख आणि सुबक करण्यासाठी  स्वयंशिस्त लावावी त्यासाठी मार्गदर्शन केले.

संजय घुंडरे पाटील यांनी मार्गदर्शन करत असताना पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर समितीचे धर्तीवर श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान   समिती आळंदी येथे विश्वस्त संख्या वाढवली जावी हा आमचा आग्रही मुद्दा राहील .त्याच बरोबर ग्रामस्थ 3 आणि वारकरी 2 यांना विश्वस्त पदी संधी देण्याची मागणी केली . ती मागणी लावून धरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायचे आहेत असे सांगितले.

समस्त ग्रामस्थ आळंदीकर या नावाने फक्त रजिस्टर असलेल्या भैरवनाथ उत्सव कमिटी पत्राचा वापर केला जावा.काही दिवसांपूर्वी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सत्कारासाठी गेलेल्या काही लोकांनी समस्त ग्रामस्थ आळंदीकर नावाचा उल्लेख केला सत्कार केला त्याबद्दल दुमत नाही.परंतु त्यामध्ये ग्रामस्थांना कोणालाही कळवण्यात आले नव्हते.दोन तीन लोकांनी जाऊन सत्कार केला त्यावर आक्षेप आहे,असेच इतर ठिकाणीही  होते ; म्हणून रजिस्टर असलेल्या समस्त आळंदीकर भैरवनाथ उत्सव मंडळ या पत्राचा वापर करावा,असे यावेळी ठरविले.

भैरवनाथाच्या शपथेने सर्व ग्रामस्थ यांनी गट तट राजकिय भेदभाव बाजूला ठेवून सर्वपक्षीय एकत्र येत गावाची अस्मिता जपावी.गावच्या विकासासाठी कार्यरत राहावे. सर्व पक्षांनी हवेदावे बाजूला ठेवावेत.व्यक्ती राग लोभ बाजूला ठेवावा.त्यासाठी कार्यरत होण्यासाठी  एक संघ राहावे.यावेळी ग्रामस्थ युवक ,ज्येष्ठ मंडळी उपस्थित (Alandi) होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.